कृष्णप्रिय गोशाळा, साई मंदिराच्यामागे किनवट

धर्म, संस्कृती रक्षणाबरोबरच गोवंश संवर्धन, संरक्षण आणि संगोपण या हेतूंना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी या गोशाळेची उभारणी करण्यात आली.  आपल्या हिंदू संस्कृतीत व हिंदू धर्मात गायीला अनन्य महत्व आहे. गायीला माता या संज्ञेने औळखल्या जाते. गो वंश टिकला तरच आपली संस्कृती टिकेल. या उद्देशाला मनी बाळगुन या गोशाळे व्दारा अनेक अशे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. मुळात गोरक्षा हाच हेतू या गोशाळेचा आहे. दिवसें दिवस समाजात गायीकडे पाहण्याचे व्यापारी दृष्टीकोन होत चालला आहे. त्याच्या विचार करुण या गोशाळेव्दारा गायी विषयीचा सकारात्मक विषय समाजाचा मनात बिंबवणे हाच होय. मन, मेंदू, मनगट परीपक्व राहण्यासाठी जसे संस्काराचे गरज असते. तसेच या मानवी शरीराला निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी गायीची आवश्यकता असते. मुळात आपली भारतीय शेती हे या गोवंशावरच आधारलेली आहे. जर गोवंशच टिकला नाही तर पुढे आपल्या परंपरागत शेतीचे काय होणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे. देव दानवांच्या समुद्र मंथनातून निघालेले अनमोल रत्न म्हणजे गाय. गाय एक कामधेनु तो सर्वांसाठी कल्पवृक्षच आहे. हा विचार सर्व समाजा पर्यंत पोहोचविण्यासाठी कृष्णप्रिय गोशाळा व्दारा, करु सेवा गायीची ..... मिळवू शक्ति जिवनाची या उद्देशाला पूर्णत्वाकडे पोहोचविण्यासाठी गोशाळेचे प्रयत्न चालु आहे. कोटयावधी भारतीयांची श्रेध्देय असलेली ही गोमाता ती सर्वांसाठी जीवन संजीवनच आहे. ते राष्ट्राची शक्ति देवता आहे. अशा या अनमोल रत्नांचे दिवसें दिवस होणारी कत्तल मन विशन्न करणारी आहे. दिवसें दिवस वाढणारे कत्तलखाने हा चिंतेचा व चिंतनाचा विषय होवून बसला आहे. गोवंश संपविण्याचा अनेकांनी जणू विळाच उचल्ला आहे. गोवंश हत्या बंदी कायदा व शासनाची धरसोड भुमिका विचार करायला लावणारी आहे. या अशा गहण प्रश्नातून उत्तर शोधत किनवट व किनवट परीसरातील गोरक्षक, गोभक्त यांना या गोशालेत आपल्या गोमातेचे संगोपण आणि संगोपण कशे होते हे पाहण्यात निश्चीत आनंद वाटेल.